बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी करणे वा हयातीचा पुरावा सादर करणे आवश्यक -जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे



कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या बँकेतील हयातीच्या दाखल्यांच्या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करणे अथवा हयातीचा पुरावा सादर करणे  आवश्यक असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांनी स्पष्ट केले.
       कोषागार कार्यालयाकडून ज्या निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन बँकेत जमा केले जाते त्या बँक शाखेमध्ये दिनांक 1 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत निवृत्तीवेतनधारकांचे हयातीचे दाखले उपलब्ध आहेत. त्या बँकेतील यादीतील नावासमोर त्यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अथवा www.jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरून डिजीटल प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांनी केले आहे.
       जे निवृत्तीवेतनधारक यादीमध्ये त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी करणार नाहीत किंवा हयातीचा पुरावा सादर करणार नाहीत त्यांचे डिसेंबर 2019 पासूनचे निवृत्तीवेतन आदा केले जाणार नाही याची सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी  नोंद घ्यावी, असेही श्री. कारंडे यांनी कळविले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.