गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 82 एस.टी.बसेस -नोडल अधिकारी भाऊ गलांडे





कोल्हापूर,दि. 10 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आज 33 एस.टी. बसेसचा वापर करण्यात आला. उद्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीही 49 एस.टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा कर्मचारी व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी भाऊ गलांडे यांनी दिली.       मतदान कर्मचाऱ्यांसाठी आज आणि उद्या दुसऱ्या प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रशिक्षणाच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी आज 33 एस.टी. बसेस पाठविण्यात आल्या. यामध्ये आजरा, गारगोटी, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज येथून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आणण्यात आले. राधानगरीमधून कागल आणि गडहिंग्लज येथे, पन्हाळा आणि शाहूवाडी येथून जयसिंगपूर येथे, कोल्हापूर,कागल येथून गडहिंग्लज  येथे तसेच कोल्हापूरमधून मुरगूड येथे, चंदगड मधून गारगोटी आणि कागल येथे, गडहिंग्लजमधून मुरगूड येथे, कागलमधून गडहिंग्लज आणि गारगोटी येथे, हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी येथून पन्हाळा येथे, तसेच शाहूवाडी मधून हातकणंगले आणि जयसिंगपूर या ठिकाणी होणाऱ्या आजच्या प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी या एस. टी. बसेसचा वापर करण्यात आला. उद्या होणाऱ्या प्रशिक्षणासाठी 49 एस.टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.