बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

रन फॉर युनिटी मध्ये सहभागी व्हा जिल्हा प्रशासनामार्फत आज एकता दौड




          कोल्हापूर दि. 30 (जि.मा.का): सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या गुरुवार दि. 31 ऑक्टोबर रोजी रन फॉर युनिटी (एकता दौड)चे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये नागरिक, युवक-युवती तसेच खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
     राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही दौड दसरा चौक,व्हिनस कॉर्नर, सुभाष रोड, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन, बिंदू चौक, शाहू मैदान, प्रायव्हेट हायस्कूल, शिवाजी स्टेडीयम या मार्गावर सकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या दौडमध्ये नागरिक युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हिा प्रशासनामार्फत केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.