मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

वाहन परवान्यासाठी गुरूवारी ऑनलाईन अपॉईंटमेंट-डॉ. एस. टी. अल्वारिस



कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) :   प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला सोडण्यात येणारे शिबीर कार्यालयातील कोटा (कॅम्प स्लॉट) शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने गुरूवार दिनांक 24 ऑक्टोबररोजी सकाळी 11 वाजल्यापासून सोडण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांनी दिली.
        सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी व कच्च्या व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी गुरूवार  24 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पध्दतीने अपॉईंटमेंट घ्यावी, असे आवाहन डॉ. अल्वारिस यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.