कोल्हापूर, दि.17 (जि.मा.का.)
:कोल्हापूरातील महापालिकेच्या शाळातील विद्यार्थी - विद्यार्थींनी तसेच नागरिकांनी
आज संपूर्ण शहरभर सायकल रॅली काढून मतदान जागृतीचा पवित्र हक्क बजावण्याचे नागरिकाकंना
आवाहन केले. गांधी मैदानापासून सुरू झालेली ही सायकल रॅली शहराच्या प्रमुख भागातून
बिंदू चौकापर्यंत गेली. गांधी मैदान येथे मतदान जागृतीसाठी सह्यांची मोहीमही राबविण्यात
आली. या मोहीमेस नागरकिांनी उर्त्स्फूत प्रतिसाद
दिला.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या
संयुक्त विद्यमाने येथील महात्मा गांधी मैदानावर आयोजीत केलेल्या मतदार जागृतीपर सह्यांच्या
मोहीमेस तसेच सायकल रॅलीच्या शुभारंभास जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त्ा
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त महापालिका आयुक्त नितीन देसाई, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त
संजय सरनाईक, दिवाकर कारंडे, प्रशासन अधिकारी एस.के. यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी
रविकांत अडसूळ, प्रियदर्शनी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जागृती
मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे
आयोजन होत असून येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वच मतदारांनी मतदानाचा
हक्क बजावावा या उद्देशाने आज शहरातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थींनीनी तसेच नागरिकांनी
भव्य सायकल रॅली काढून कोल्हापूरकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी आयोजित केलेल्या
सह्यांच्या मोहीमेसही शहरवासियांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.
मतदानाचा पवित्र हक्क बजावा- जिल्हाधिकारी
दौलत देसाई
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या
संयुक्त विद्यमाने मतदार जागृतीपर आयोजित केलेल्या सह्यांची मोहीम तसेच सायकल रॅली
या उपक्रमातून मतदारांमध्ये मतदाना विषयी निश्चित जागृती निर्माण होईल असा विश्वास
व्यक्त करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, प्रत्येक भारतीयाला घटनेने दिलेले मतदानाचा
पवित्र हक्क प्रत्येक मतदाराने बजावलाच पाहिजे हा संदेश खऱ्या अर्थाने मतदारापर्यंत
पोहचविण्यासाठी सायकल रॅली आणि सह्यांची मोहीम सहाय्यभूत ठरेल असेही ते म्हणाले. गेल्या
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर
जिल्ह्यात सरासरी 75.15 टक्के मतदान झाले होते. येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानात ही
टक्केवारी निश्चितपणे वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणूक पारदर्शक, मुक्त आणि निर्भय
वातावरणात पार पडतील यासाठी वचनबध्द होवूया, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई
म्हणाले, मी मतदार आहे याचा सार्थ अभिमान बाळगून येत्या विधानसभा निवडणूकीत लोकशाही
बळकटीकरणासाठी सर्वांनीच मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्यावा. कोणत्याही
आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करून मतदानाचा आपला हक्क बजावावा, असे आवाहनही
त्यांनी केले.
मतदान करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असून
येत्या 21 ऑक्टोबर रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी,
असे आवाहन करून महापालिका आयुक्त्ा डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, शहरवासियांनी मतदाना दिवशीच्या सुट्टीत
सर्वात प्रथम आपले मतदान करावे. आजच्या सह्यांची मोहीम व सायकल रॅलीमुळे मतदान जागृतीचा
संदेश शहरवासीयांपर्यंत यशस्वीपणे पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या विधानसभा
निवडणुकीत शहरातील सर्वच मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकटीकरणास
सहाय्यभूत व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस.के.
यादव यांनी स्वागत करुन सह्यांची मोहीम व सायकल
रॅलीच्या उपक्रमाची माहिती दिली. या सायकल रॅलीमध्ये शहरवासीय तसेच महापालिकेती सर्व
अधिकारी-कर्मचारी, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक उपस्थित होते.
महात्मा गांधी मैदानापासून निघालेली सायकल रॅली महाव्दार रोड, पापाची तिकटी, महापालिका,
सीपीआर, दसरा चौक मार्गे बिंदू चौक येथे या सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.