कोल्हापूर,दि. 9 (जि.मा.का.) : शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील
आस्थापनांनी सप्टेंबर 2019 रोजी संपणाऱ्या तिमाहीचे ई-आर -1 विवरणपत्र 31 ऑक्टोबर पर्यंत
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https//:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन सहाय्यक संचालक
ज.बा.करीम यांनी केले आहे.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत सर्व कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती
(पुरूष/स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम चालू आहे. तिमाही विवरणपत्र सादर करण्याची
मुदत 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत असून ई-आर रिटर्नची
सांखिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत भरणे
आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य
विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी (0231- 2545677) संपर्क साधावा, असेही
सहाय्यक संचालक श्री. करीम यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.