सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

79 उमेदवारांची माघार ; 10 मतदार संघात 106 उमेदवार - जिल्हाधिकारी दौलत देसाई




कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : विधानसभा मतदार संघात अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 79 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 106 उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
चंदगडमधून 20 जणांनी माघार घेतल्याने 14 उमेदवार, राधानगरी मधून 10 जणांनी माघार घेतल्याने 12 उमेदवार, कागल मधून 5 जणांनी माघार घेतल्याने 6 उमेदवार, कोल्हापूर(दक्षिण) मधून 4 जणांनी माघार घेतल्याने 8 उमेदवार, करवीर मधून एकाने माघार घेतल्याने 8 उमेदवार, कोल्हापूर(उत्तर) मधून 4 जणांनी माघार घेतल्याने 8 उमेदवार, शाहुवाडी मधून 3 जणांनी माघार घेतल्याने 11 उमेदवार, हातकणंगले (अ.जा.) मधून 13 जणांनी माघार घेतल्याने 16 उमेदवार, इचलकरंजी मधून 3 जणांनी माघार घेतल्याने 14 उमेदवार आणि शिरोळ मधून 16 जणांनी माघार घेतल्याने 9 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
            विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक लढविणारे उमेदवार, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे
            271-चंदगड- रमेश दत्तू रेडेकर (अपक्ष-कप आणि बशी), शिवाजी शट्टूप्पा पाटील (अपक्ष-पाण्याची टाकी), कुपेकर संग्रामसिंह ऊर्फ संग्रामसिंह भाग्येशराव देसाई (शिवसेना-धनुष्यबाण) , सुभाष वैजू देसाई (अपक्ष-ऊस शेतकरी) , श्रीकांत अर्जुन कांबळे (बसपा-हत्ती), अप्पासाहेब बाबुराव भोसले (अपक्ष-सुप), अनिरुध्द केदारी रेडेकर (अपक्ष-टेबल), संतोष कृष्णा पाटील (अपक्ष-शिट्टी), प्रकाश रामचंद्र रेडेकर (अपक्ष-हेलिकॉप्टर), नामदेव बसवंत सुतार (अपक्ष-स्टूल), राजेश नरसिंगराव पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-घड्याळ), विनायक विरगोंडा पाटील (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), अशोक काशिनाथ चराटी (जन सुराज्य शक्ती-नाराळाची बाग), महेश नरसिंगराव पाटील (कॅमेरा).
            272-राधानगरी- आबिटकर प्रकाश आनंदराव (शिवसेना-धनुष्यबाण), के.पी. पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-घड्याळ), युवराज रामचंद्र येडूरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना-रेल्वे इंजिन), शिंदे विजयराव गोविंदा (बसपा-हत्ती), जीवनदादा पांडुरंग पाटील (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर) अरुण गणपतराव डोंगळे (अपक्ष-शिट्टी), कोरगांवकर प्रविण प्रकाश (अपक्ष-स्टुल), कृष्णा हणमंत देसाई (अपक्ष-बॅट), चंद्रकांतदादा बाबुराव पाटील (अपक्ष-हेलिकॉप्टर), दिनकर रामचंद्र चांदम (अपक्ष-काचेचा पेला), राहूल बजरंग देसाई (अपक्ष-ऑटो रिक्षा), सत्यजित दिनकरराव जाधव (अपक्ष-कप आणि बशी)
            273- कागल- मुश्रीफ हसन मियालाल (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-घड्याळ), रवींद्र तुकाराम कांबळे (बसपा-हत्ती), संजय आनंदराव घाटगे (शिवसेना-धनुष्यबाण), सिध्दार्थ नागरत्न (बहुजन मुक्ती पार्टी-खाट), घाटगे समरजितसिंह विक्रमसिंह (अपक्ष-कप आणि बशी), श्रीपती शंकर कांबळे (अपक्ष-अंगठी)
            274- कोल्हापूर (दक्षिण)- अमल महाडिक (भाजपा-कमळ), ऋतुराज संजय पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस-हात), सचिन आप्पासो कांबळे (बसपा-हत्ती), नागावकर चंद्रकांत सुदामराव (बहुजन मुक्ती पार्टी-खाट), बबनराव ऊर्फ दिलीप पांडुरंग कावडे (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), अमित महाडिक (अपक्ष-कप आणि बशी), राजेंद्र बाबु कांबळे (अपक्ष-हिरवी मिरची), सलिम नुरमहम्मद बागवान (अपक्ष-शिट्टी)  
            275-करवीर- नरके चंद्रदीप शशिकांत (शिवसेना-धनुष्यबाण),  पी.एन.पाटील (सडोलीकर) (इंडियन नॅशनल काँग्रेस-हात),  बजरंग कृष्णा पाटील (बसपा-हात्ती), डॉ. आनंदा दादू गुरव (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), गोरख कांबळे (पणोरेकर) (बहुजन मुक्ती पार्टी- खाट) ,  डॉ. चव्हाण प्रगती रवींद्र (संभाजी ब्रिगेड पार्टी-शिवण यंत्र), ॲड. माणिक बाबुराव शिंदे (बळीराजा-जेवणाचे ताट), माने अरविंद भिवा (अपक्ष-बॅट).      276-कोल्हापूर (उत्तर)- अजय प्रकाश कुरणे (बसपा-हत्ती), चंद्रकांत पंडीत जाधव (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-हात), राजेश विनायक क्षीरसागर (शिवसेना-धनुष्यबाण), सतीशचंद्र बाळकृष्ण कांबळे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष-कणीस आणि विळा), राहुल अनादपिंड राजहंस (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), अमित अरविंद अतिग्रे (अपक्ष-ऑटो रिक्षा), सलीम नुरमहम्मद बागवान (अपक्ष-शिट्टी),  संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे (अपक्ष-रोडरोलर)
            277- शाहूवाडी-  गौतम जगन्नाथ कांबळे (बसपा-हत्ती), सत्यजीत बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर (शिवसेना-धनुष्यबाण), भाई भारत रंगराव पाटील (पीझंटस ॲण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया-खटारा), डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) (जन सुराज्य शक्ती-नारळाची बाग), डॉ. सुनिल नामदेव पाटील (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), अफजल कासम देवळेकर (अपक्ष-कप आणि बशी), यादव संभाजी आनंदा (अपक्ष-ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी), विनायक दिनकर गुजर (अपक्ष-केक), विनायक दिलीप जाधव (अपक्ष-फुगा),सज्यजित विलासराव पाटील (अपक्ष-विजेचा खांब), संतोष केरबा खोत (अपक्ष-अंगठी)
            278-हातकणंगले. आवळे राजू (बाबा) जयवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस-हात), चंद्रशेखर सदाशिव कांबळे (बसपा-हत्ती), डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर (शिवसेना-धनुष्यबाण), दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) (जन सुराज्य शक्ती-नारळाची बाग), कांबळे किरण सुकुमार (ताराराणी पक्ष-प्रेशर कुकर), एस.पी.कांबळे (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), सागर नामदेव शिंदे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन-पतंग), डॉ. अविनाश जयवंत सावर्डेकर (अपक्ष-शिट्टी), आवळे शिवाजी महादेव (अपक्ष- ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी), कांबळे प्रदिप भिमसेन (अपक्ष-बॅट), ॲड. तेजस चिमाजी पठाणे (अपक्ष-कप आणि बशी), प्रा. डॉ. प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (सर) (अपक्ष-फुटबॉल), राजीव किसनराव आवळे (अपक्ष-ऑटो रिक्षा), राजू दिलीप वायदंडे (अपक्ष-दूरदर्शन), राहूल उत्तम पाटोळे (अपक्ष-टीलर), संदीप आकाराम दबडे (अपक्ष-चावी)
            279-इचलकरंजी- उमेश बाजीराव खांडेकर (बसपा-हत्ती), खंजीरे राहूल प्रकाश (इंडियन नॅशनल काँग्रेस-हात), सुरेश गणपती हाळवणकर (भाजपा-कमळ), आमणे शशिकांत वसंतराव (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), इस्माईल अब्बास समडोळे (स्वराज इंडिया-कप आणि बशी), संतोष दत्तात्रय कोळी (बाळमहाराज) (अखिल भारतीय हिंदू महासभा-शिट्टी), अभिजीत महावीर खोत (अपक्ष-बॅट), कुबेरसिंग उत्तमसिंग रजपूत (अपक्ष-सफरचंद), नितीन दिलीप लायकर (अपक्ष-टेबल), प्रकाश आण्णा आवाडे (अपक्ष-प्रेशर कुकर), बाळकृष्ण काशीनाथ म्हेत्रे (अपक्ष-मोत्यांचा हार), शकुंतला सचिन मगदूम (अपक्ष-एअर कंडीशनर), शाहूगोंडा सातगोंडा पाटील (अपक्ष-कपाट), संजय परसराम पोळ (अपक्ष-रोड रोलर)
            280-शिरोळ- आदम बाबू मुजावर (बसपा- हत्ती), उल्हास संभाजी पाटील (शिवसेना-धनुष्यबाण), अनिल ऊर्फ सावकर बाळू मादनाईक (स्वाभिमानी पक्ष-बॅट), अनिलकुमार दिनकरराव यादव (जन सुराज्य शक्ती-नारळाची बाग), सुनिल रामचंद्र खोत (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), जितेंद्र रामचंद्र ठोंबरे (अपक्ष-हेल्मेट), प्रमोददादा सुरेश पाटील (अपक्ष-शिट्टी), राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर)  (अपक्ष-कप आणि बशी), शिवाजी धोंडीराम संकपाळ (अपक्ष-शिवण यंत्र).         

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.