कोल्हापूर,दि. 14 (जि.मा.का.) : आवेष्टित वस्तू
विकत घेताना त्याचे वजन तपासून खरेदी करावी, असे आवाहन सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र
यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
सध्या दिवाळीनिमित्त आवेष्टित वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री
होत आहे. आवेष्टित वस्तूंवर MRP अतिशय
छोट्या अक्षरात लिहिलेले असल्याने MRP चा स्पष्ट
बोध होत नाही, अशा वस्तू खरेदी करू नयेत. आवेष्टित वस्तूंवर दूरध्वनी क्रमांक, ई-मेल
आयडी बंधनकारक आहे. सर्व ग्राहकांनी, किरकोळ विक्रेत्यांनी -घाऊक विक्रेत्यांनी अशा
वस्तू खरेदी करताना दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडीची खात्री करून खरेदी करावी व खरेदी
केल्यानंतर बील घेण्याची खबरदारीही घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. याबाबत काही तक्रार असल्यास सहायक नियंत्रक,
वैध मापन शास्त्र या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0231- 2542549 संपर्क करावा. हेल्पलाईन नंबर 022-22622022 वर तक्रार नोंदवावी.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.