कोल्हापूर दि. 19 (जि.मा.का.)
:- कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता पोलीस कवायत
मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा येथे पोलीस स्मृती दिन पाळण्यात येणार आहे, अशी
माहिती पोलीस उप अधीक्षक (मुख्या) यांनी पत्रकाव्दारे कळविली आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण
करून पोलीस हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. समारंभास नागरिकांनी उपस्थित
रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.