कोल्हापूर,
दि. 19 (जिमाका) : सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असून
त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा अधिकार बजावावा, असे
आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात आज सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ उपस्थित होते.
आज सायंकाळपासून ते सोमवार 21 ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत कोरडा दिवस घोषित करण्यात
आलेला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, मतदार संघाच्या बाहेरुन आणलेले
व त्या मतदार संघाचे मतदार नाहीत अशा राजकीय, पक्ष, मिरवणुकीतील प्रचार कार्यकर्त्यांना
नियमितपणे मतदार संघात उपस्थित राहता येणार नाही. ज्या ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा
अधिक मतदान केंद्र एकाच इमारतीत आहेत त्या ठिकाणी आणि क्रिटीकल मतदान केंद्रांवर बाहेरील
परिसरात चित्रीकरण करण्यात येणार आहे. अशा ठिकाणी विशेष पोलीस दलाची नियुक्तीही करण्यात
येत आहे.
जिल्ह्यामध्ये
एकूण 3342 मतदान केंद्रावंर मनुष्यबळ, वाहन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता
गृहे, प्रथमोपचार, वाहतूक व्यवस्था यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 13368 मतदान कर्मचारी
नियुक्त केले असून 1605 राखीव कर्मचारी आहेत.
जिल्ह्यातील 68 क्रिटीकल मतदान केंद्रांवर 98 सुक्ष्म निरीक्षकांची निुयक्ती
करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24197 दिव्यांग
मतदार असून त्यांसाठी रॅम्प, व्हील चेअर, ब्रेललिपीमध्ये मतपत्रिका, मॅग्नेफाईन ग्लास,
मतदार चिट्या, मदतनीस व वाहन व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. विविध भरारी पथकांकडून 2 कोटी 99 लाख 14 हजार
130 रोकड जप्त करण्यात आली आहे. 1 कोटी 59 लाख 946 किंमतीचे सोने, चांदीचे दागिने,
38 लाख 20 हजार 860 किंमतीचा मद्यसाठा, 6 लाख 74 हजार 556 रुपयांचा गुटखा आणि 3 अवैध
शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
17
हजार 959 टपाली मतपत्रिका वितरीत करण्यात आली असून 9 हजार 266 टपाली मतदान झाले आहे.
सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी एकूण 3 हजार 672 बीयु, 3 हजार 342 सीयु आणि तितकेच व्हीव्हीपॅट
यंत्र लावण्यात येणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदार संघात 20 टक्के बीयु,
20 टक्के सीयु आणि 30 टक्के व्हीव्हीपॅट यंत्र राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानाच्या
दिवशी इव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाल्यास त्यासाठी 20 अभियंत्यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय माध्यम पूर्व प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून आजअखेर
252 जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण करण्यात आले आहे. मतदार जनजागृतीसाठी जिल्ह्यामध्ये 3 हजार 758 रॅली, 11 चित्ररथ, 193
पथनाट्य, 165 हौसिंग सोसायटीच्या बैठका, 12 सायकल रॅली, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध
स्पर्धा, दिव्यांग मतदार जागृती कार्यक्रम 16, 6 लाख 12 हजार 296 संकल्प पत्र, दिव्यांग
लेखिका सोनाली नवांगुळे यांचे आवाहन, 11 पोवाडा, तृतीय पंथीय, देवदासी यांच्यासाठी
विशेष मोहीम आणि स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आहे.
आचारसंहिता
भंगाचे आठ गुन्हे दाखल
विधानसभा
निवडणूक कालावधीत आचारसंहिता भंगाचे आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 272-
राधानगरीमध्ये जीवन पांडुरंग पाटील (वंचित बहुजन विकास आघाडी), प्रकाश आनंदराव आबिटकर, स्वराज्य संजय चिले, रमेश
नागाप्पा कोरवी (शिवसेना), कृष्णराव परशराम पाटील आणि राहूल बंजरंग देसाई (राष्ट्रवादी
कॉग्रेस), 277-शाहुवाडीमध्ये सत्यजित बाबासो पाटील, वसंत ज्ञानू पाटील (शिवसेना).
मतदान केंद्रात
मोबाईल नेल्यास गुन्हा
21 ऑक्टोबर
रोजी होणाऱ्या मतदानादिवशी मतदान केंद्रात मोबाईल घेऊ जाता येणार नाही. मोबाईल घेऊन
गेल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करुन कारवाई केली जाईल, अशा इशारा
जिल्हाधिकारी देसाई यांनी दिला.
|
मतदारांनी निर्भयपणे,
कोणत्याही अमिषाला बळी न पडता जास्तीत जास्तपणे मतदान करुन जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा
असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.