शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

दिपावलीनिमित्त गांधीनगर बाजारपेठेत माल वाहतुक वाहनांसाठी मनाई आदेश जारी



कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : आगामी दिपावली या सणानिमित्त गांधीनगर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर लोक खरेदीसाठी येत असतात यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिनांक 30 ऑक्टोबर अखेर गांधीनगर शहरातील आतील भागात अवजड,जड व मध्यम माल वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेशास व माल चढ उतार करण्यास मनाई आदेश जारी केला आहे.
दि. 27 ते 30 ऑक्टोबर  दरम्यान दिपावली हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असून गांधीनगर ही  पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापडाची व इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक व सौंदर्य प्रसाधने इतर शो वस्तू इत्यादी व्यापाराची होलसेल व रिटेल बाजारपेठ असून या मालाचे खरेदीकरीता किमान 15 ते 20 हजार लोक दिवसातून वाहनासह येत-जात असतात व व्यापार बाजारपेठत ये-जा करण्यास एकच मुख्य रस्ता असून बाकी रस्ते बोळ अरूंद रस्ते आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहेत. सदर वाहतुक अडथळ्याने समस्या होऊ नये व दिपावली सण कालावधीत गांधीनगर येथील रहदारी सुरक्षीत व सुरळीत रहावी, यासाठी नागरीक व पादचारी यांना रस्त्यावर सुरक्षितता प्रस्थापित व्हावी, याकरीता पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस अधिनियम सण 1951 चे कलम 33 चे पोटकलम 1 (ब) अन्वये रहदारी विनिमयाचे असलेल्या अधिनियमानुसार अवजड,जड व मध्यम माल वाहतुक करणाऱ्या वाहनांना दिनांक 19 ते 30 ऑक्टोबर अखेर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत गांधीनगर शहरातील आतील भागात प्रवेशास व माल चढ उतार करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे निर्देश व आदेश जारी केले आहेत.
अवजड,जड व मध्यम माल वाहतुक करणाऱ्या वाहनांना दिनांक 19 ते 30 ऑक्टोबर अखेर  सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत तनवाणी कॉर्नरपासून गांधीनगरकडे (केएमटी व शासकीय वाहन तसेच ॲब्युलंस व खेरीज) सर्व चाकी माल वाहतुक चारचाकी वाहनापासुन पुढे असणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. तसेच गणेश टॉकीज ते वळीवडे रोड (ट्रान्सपोट लाईन) दरम्यान चारचाकी वाहनांना बंदी करण्यात येत आहे. तसेच रि‍क्षा मिनी टँम्पो यांना वळीवडे, चिंचवाड गावात जाणा-येणाऱ्या नागरिकांकरीता गणेश टॉकीज पासून उत्तरेस कोयना कॉलनी मार्गे सरकारी दवाखाना ते वळीवडे असा मार्ग राहिल.
जड व मध्यम माल वाहतुक करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग :- गांधीनगर ट्रान्सपोर्ट लाईनकडे वाहनांना ये जा करण्यासाठी पर्यायी मार्ग तावडे हॉटेल, उंचगाव फाटा, गडमुडशिंगी, चिंचवाड मार्गे गांधीनगर असा मार्ग राहिल. वळीवडे, चिंचवाड गावात जाणा-येणाऱ्या नागरींकारिता गणेश टॉकीज पासून उत्तरेस कोयना कॉलनीमार्गे सरकारी दवाखना ते वळीवडे असा मार्ग राहिल. ट्रान्सपोर्ट लाईनमधून गांधीनगर बाझारपेठ व्यापाऱ्यांना माल देणे-घेणे करीता येणारी सर्व चार चाकी मिनी टॅम्पो, रिक्षा यांना रात्री 10 ते सकाळी 1 वाजेपर्यंत असेल.
दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता निश्चित करण्यात आलेले पार्कींग :- चारचाकी व दुचाकी वाहनांकरीता किनारा साडी सेंटर व पोवार मळा या ठिकाणी दोन वहानतळ (पार्कींग व्यवस्था) करण्यात आली आहे. या वाहतुक नियोजनाबाबत नागरिक,रहिवाशी,व्यापारी,ग्राहक तसेच मोटार वाहन चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.