मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या उमेदवाराला नोटीस




      कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणारे हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमदेवार प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (सर) यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले-कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे.
       हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमेदवार श्री. गंगावणे यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर एक पोस्ट प्रसारित करुन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे हातकणंगलेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सकृतदर्शनी निदर्शनास आले. याबाबत श्री. गंगावणे यांना नोटीस बजावली असून 24 तासाच्या आत खुलासा सादर करण्यास कळविण्यात आले आहे. खुलासा मुदतीत न सादर केल्यास  अथवा समाधानकारक न वाटल्यास भारतीय दंड विधान संहिता 1860 चे कलम 188 व 171 (जी) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दामले-कुलकर्णी यांनी दिला.
            जे कोणी निवडणूक निकालावर परिणाम करण्याच्या हेतुने, उमेदवाराच्या वैयक्तिक चारित्र्य किंवा वर्तनाबाबत जाणीवपूर्वक खोटी माहिती (व्हॅटसॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम) इत्यादी सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करतील त्यांच्यावर जिल्हाधिकारी दंडाधिकारी यांचा मनाई आदेश भंग केलेच्या कारणावरुन भारतीय दंड विधान संहिता 1860 चे कलम 188 व 171 (जी) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.
 0 0 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.