कोल्हापूर, दि. 17 (जि.मा.का.) :-
सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीसाठी येत्या
21 ऑक्टोबरला मतदान होत असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र
ओळखपत्र सोबत घेऊन जावे तथापि ज्या मतदारांकडे
मतदान ओळखपत्र नाही अथवा खराब झाले आहे, अस्पष्ट आहे, अशा व्यक्तीही मतदान करु शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे
ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
भारत निवडणुक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांमध्ये पासपोर्ट,
वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले शासकीय,
निमशासकीय, शासकीय महामंडळामधील कार्यरत कर्मचारी-अधिकारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले
बँकेचे, पोस्टाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत देण्यात आलेले
स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत दिलेले जॉब कार्ड, हेल्थ इंन्शुरन्स स्मार्ट कार्ड,
छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खासदार
व आमदार यांना दिलेले शासकीय ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदारांना मतदान केंद्रांवर
ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.