शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

सामाजिक समस्यांवर आधारित चित्रांचे शाहू स्मारक येथे 20 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन












कोल्हापूर दि. 18 (जि.मा.का.) :- येथील शाहू स्मारक येथे चित्रकार झाकिरहुसेन एम कोरलाहल्ली यांच्या सामाजिक समस्यांवर आधारित चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि अंतरराष्ट्रीय कलाकार संजीव संकपाळ यांच्याहस्ते आज करण्यात आले. सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत  असणारे हे प्रदर्शन 20 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी चित्रकार विजय टिपुगडे, सुनील पंडित, कर्नाटकातील चित्रकार गजानन कांबळे, दारा पी. सरदार, वाचन कट्टा संकल्पक युवराज कदम आणि अपूर्वा खांडेकर उपस्थित होते. 
समाजातील विविध समस्यांवर ॲक्रीलिक रंगात तसेच चारकोल मध्ये छायाचित्रे काढण्यात आली आहेत. यातील काही छायाचित्रांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. यावेळी चित्रकार झाकिरहुसेन यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
 0 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.