निवडणूक कर्तव्य बजावताना
सर्जेराव भोसले यांचा हृदयविकाराने मृत्यू
कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का.) : कागल
तालुक्यातील हसूर खुर्द येथील मतदान अधिकारी सर्जेराव भोसले यांचा हृदयविकाराच्या
तीव्र झटक्याने आज मृत्यू झाला.
मयत श्री भोसले
यांची अध्यापक लक्ष्मी विद्यालय हसूर खुर्द ता कागल यांची मतदान केंद्र क्र. 21
पोहाळे तर्फे बोरगाव विद्यामंदिर पूर्व बाजू खोली क्र. 2 येथे मतदान अधिकारी क्र. 1
म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
या ठिकाणी निवडणूक कर्तव्य बजावत असताना त्यांना अस्वस्थ वाटू
लागल्याने नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल केले. परंतु,
त्यांची प्रकृती अत्यवस्थ वाटल्याने त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात
उपचारासाठी सायंकाळी 4 वा दाखल करण्यात आले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने
त्यांचा 4.30 वा मृत्यू झाला, अशी माहिती करवीर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक
निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.