कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) :
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रमणमळा व राजाराम तलाव येथे उद्या गुरुवार दि. 24
ऑक्टोबर रोजी होत आहे. सकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत
रहदारीचे नियमन लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव
देशमुख यांनी दिले आहेत.
रमणमळा येथील मतमोजणी रहदारीचे नियमन
याप्रमाणे- वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग (अत्यावश्यक सेवेतील
पोलीस, ॲम्ब्युलन्स, फायरब्रिगेड या वाहनाखेरीज) हेड पोस्ट ऑफिस चौक ते एस.पी.ऑफिस
चौक ते चार नंबर फाटकाकडे जाण्यास व येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
करण्यात येत आहे. नमुद मार्गाने शिरोली MIDC येथे जाणाऱ्या वाहनधारकांनी
धैर्यप्रसाद हॉल मार्गे पुढे मार्गस्त व्हावे. पितळी गणपती चौक ते एस.पी. ऑफिस चौक
जाण्यास व येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना पितळी गणपती या ठिकाणी प्रवेश बंद
करण्यात येत आहे. रमणमळ्यातून येवून ड्रीमवर्ल्डच्या पाठीमागील रोडने धोबी कट्टा
पर्यंत ये-जा करण्यास तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोडावूनकडे
जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
वळविण्यात आलेला मार्ग याप्रमाणे- महावीर
कॉलेज ते कसबा बावड्याकडे जाणारी सर्व प्रकारची मोटार वाहने, के.एम.टी. बसेससह ही
जिल्हाधिकारी कार्यालय चौक-आदित्य कॉर्नर- धैर्यप्रसाद हॉल-सर्किट हाऊस-लाईन बजार
मार्गे ये-जा करतील. कसबा बावड्याकडून मध्यवर्ती किंवा महावीर कॉलेजकडे जाणारी
सर्व वाहने ही भगवा चौक-लाईन बाजार-सर्किट हाऊस-धैर्यप्रसाद हॉल मार्गे सोयीनुसार
मार्गस्त होतील.
पार्किंग
सुविधा याप्रमाणे- मतमोजणी करीता आलेल्या अधिकारी, कर्मचारी व
प्रतिनिधी यांच्या वाहनासाठी पार्किंग पोलीस मुख्यालय गार्डन समोरील रिकामी जागा
आणि पोलीस फुटबॉल ग्राऊंड या दोन ठिकाणी करण्यात येत आहे.
निवडणूक निकाल पाहण्यासाठी येणाऱ्या
नगारिकांची वाहन पार्किंग याप्रमाणे- मेरी वेदर मैदानावर भाजपा व शिवसेना पक्ष
यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनासाठी पार्किंग सुविधा. पितळी गणपती चौक ते आर. टी.
ओ. ऑफिस रत्याच्या दोन्ही बाजूस सिंगल लाईन पार्किंग वंचित आघाडी पक्ष यांच्या
कार्यकर्त्यांच्या वाहनासाठी पार्किंग सुविधा. रेणुका मंदिर पाठीमागील बाजू
रिकाम्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्या
कार्यकर्त्यांच्या वाहनासाठी पार्किंग सुविधा करण्यात आली आहे.
रमणमळा परिसरातील स्थानिक रहिवाशांकरिता
सूचना-यशवंत सोसायटी पोवार मळा या भागातील रहिवाशांनी येण्या-जाण्यासाठी 100
फुटी रोडचा वापर करावा. रमणमळा, 100 ठाण, जावडेकर सोसायटी तसेच छत्रपती शाहू
हायस्कूल परिसरातील लोकांनी येण्या- जाण्यासाठी पोलो ग्राऊंड, छत्रपती शाहू
हायस्कूल, महावीर कॉलेज किंवा प्राणी संग्रहालय पाठीमागील फाटक ते महावीर कॉलेज या
मार्गाचा वापर करावा.
राजाराम तलाव येथील मतमोजणी अनुषंगाने
रहदारीचे नियमन याप्रमाणे-वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग-
(अत्यावश्यक सेवेतील पोलीस, ॲम्ब्युलन्स, फायरब्रिगेड या वाहनाखेरीज)
सरनोबतवाडीकडून राजाराम तलाव मार्गे छत्रपती शिवाजी विद्यापीठकडे जाण्यास व
येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना एच.पी.गॅस गोडावून व सरनोबतवाडी नाका टी पॉईंट
या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
वळविण्यात आलेला मार्ग- छत्रपती शिवाजी
विद्यापीठकडून सरनोबतवाडीकडे जाणाऱ्या वाहनांनी सरनोबतवाडी टोल नाकाकडे वळण न घेता
सरळ पुढे शाहू टोल नाका मार्गे राष्ट्रीय महामार्गाने सरनोबतवाडीकडे मार्गस्त
व्हावे. सरनोबतवाडीकडून छत्रपती शिवाजी विद्यापीठकडे जाणाऱ्या वाहनांनी राजाराम
तलावाकडे वळण न घेता राष्ट्रीय महामार्गाने सरळ उजळाईवाडी अंडर ब्रीज मार्गे किंवा
उंचगाव अंडर ब्रीज मार्गे मार्गस्त व्हावे.
पार्किंग सुविधा याप्रमाणे- मतमोजणी
करीता आलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांच्या वाहनासाठी पार्किंग- मतमोजणी
ठिकाणच्या समोरील रिकाम्या जागेमध्ये (रस्त्याच्या पलिकडे) करण्यात येत आहे.
निवडणुक निकाल पाहण्यासाठी येणाऱ्या
नागरिकांची वाहने पार्किंग-युको बँक शेजारील रिकाम्या जागेवर भाजपा व शिवसेना
पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनासाठी पार्किंग सुविधा, शिवाजी विद्यापीठ
वृत्तपत्र विद्या विभागाचे रिकाम्या जागेवर वंचित आघाउी पक्ष यांच्या
कार्यकर्त्यांच्या वाहनासाठी पार्किंग सुविधा, एच.पी.गॅस गोडावून समोरील रिकाम्या
जागेवर काँग्रेस, राष्ट्रवारी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या
वाहनासाठी पार्किंग सुविधा करण्यात आली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.