कोल्हापूर
दि. 18 (जि.मा.का.) :- पर्यावरण संवर्धन विषयक कृती व जाणीव जागृती करणाऱ्या प्रयत्नांना
प्रोत्साहन देण्यासाठी सृष्टी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येतात. महाराष्ट्र शासन आणि पर्यावरण
शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी मित्र पुरस्कार 2019-20 साठी 30 नोव्हेंबर
2019 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पर्यावरण विभागाचे अवर सचिव चंद्रकांत विभुते यांनी
केले आहे.
पर्यावरण
प्रकल्प या श्रेणीत अनुक्रमे 10 हजार, 8 हजार आणि 5 हजार, पर्यावरण बालसाहित्य, स्लाईड
शो, पर्यावरण छायाचित्र, इको क्लब, पर्यावरण शिक्षणासाठी अद्यापन पध्दती, पर्यावरण
संवर्धनात महिलांचे योगदान या सहाही प्रत्येक श्रेणीसाठी 5 हजार, 3 हजार आणि 2 हजार
आणि पर्यावरण घोषवाक्य श्रेणीसाठी अनुक्रमे 3 हजार, 2 हजार व 1 हजार प्रथम, द्वितीय,
तृतीय पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पर्यावरणपूरक
तसेच पर्यावरण संवर्धन विषयक कृती उपक्रम व जाणीव जागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांना
प्रोत्साहन देणे या उद्देशाप्रती शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना सृष्टी
मित्र पुरस्कार प्रदान केले जातात. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, लेखक, कवी, छायाचित्रकार,
व्यंगचित्रकार, तज्ज्ञ, शिक्षक, महिला आणि
इतर नागरिकांना पर्यावरण संवर्धन विषयक कृती उपक्रमातील आपले कौशल्य, सर्जनशीलता आणि
नवीन कल्पना मांडता याव्यात म्हणून सृष्टी मित्र पुरस्कारांचे आयोजन आहे. स्थानिक पर्यावरणीय समस्यांना ओळखून राबविलेल्या
प्रयत्नांचा तपशील विद्यार्थी आणि नागरिक प्रवेशिका स्वरुपात सादर करु शकतात. पर्यावरणीय
समस्यांना शाश्वत विकासाची जोड देऊन हाताळणे हे पर्यावरण संवर्धनासाठी केलेले प्रयत्न
उपयोगी आणि महत्वाचे आहेत.
विद्यार्थ्यांनी
स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी राबविलेले उपक्रम आणि प्रयत्न, शिक्षक, किंवा तज्ज्ञांनी
पर्यावरण शिक्षणातील वापरलेल्या अध्यापन, पध्दती, लेखक आणि कवींचे पर्यावरण विषयक आणि
पर्यावरण संवर्धनपर स्वनिर्मित साहित्य तसेच महिलांनी स्वत: किंवा समुहाने हाती घेतलेले
पर्यावरणपूरक प्रयत्न हे सृष्टी मित्र पुरस्कारांच्या माध्यमातून प्रवेशिका स्वरुपात
सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी 020-27298862, ईमेल-srushtimitra@gmail.com, वेबसाईट-smawards.in,
फेसबुक-www.facebook.com/smawards, Twitter @SrushtiMitra येथे संपर्क साधावा. तसेच
सारिका थोरवे, मंगेश निकम, पर्यावरण शिक्षण केंद्र, दूरध्वनी क्र. 020-27298862, ईमेल-sarika.thorave@ceeindia.org,
संकेतस्थळ-smawards.in, फेसबुक-www.facebook.com/smawards,
Twitter-@SrushtiMitra,Twitter.com/SrushtiMitra येथे संपर्क करावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.