कोल्हापूर,
दि. 6 (जिमाका) : चंदगड, राधानगरी आणि कागलमधील उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक
खर्चाच्या लेख्यांची तपासणी खर्च निरीक्षक शील आशीष यांच्या उपस्थितीत होणार आहे,
अशी माहिती जिल्हास्तरीय निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी संजय राजमाने
यांनी दिली.
गुरुवार
दि. 10 ऑक्टोबर रोजी पहिली, सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी दुसरी व शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर
रोजी सकाळी 10 वा. तिसरी तपासणी आहे. संबंधित विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या
कार्यालयात होणार आहे.
या
तपासणीकरिता सर्व संबंधित उमेदवार यांनी त्यांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंद वह्या आणि
प्रमाणकांच्या छायाप्रती तसेच बँक पासबुकची छायाप्रत अथवा वितरण तसेच आवश्यक कागदपत्रे
घेवून उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने ओळखपत्रासह उपस्थित रहावे.
वेळापत्रकानुसार
उमदेवारांनी त्यांचे लेखे तपासणीसाठी सादर केले नसल्यास लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 नुसार उमेदवारांनी त्यांच्या दैनंदिन खर्चाचे लेखे
जतन केलेले नाहीत असे मानण्यात येईल. खर्चाचे लेखे सादर केले नसलेल्या उमेदवारांबाबत
व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल. सक्षम न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या कलम 171
(1) नुसार तक्रार दाखल करण्यात येईल. उमेदवारास दिलेल्या प्रचार वाहनांचे परवाने तात्काळ
रद्द करण्यात येईल, असा इशाराही श्री. राजमाने यांनी दिला आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.