मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

श्री त्र्यंबोली देवीच्या यात्रेनिमित्त वाहतूक विनिमय आदेश जारी



कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : श्री त्र्यंबोली देवीच्या ललिता पंचमी यात्रेनिमित्त पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 नुसार प्राप्त अधिकारान्वये कोल्हापूर शहरात वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून श्री त्र्यंबोली देवीची यात्रा संपेपर्यंत लागू राहतील.
ललिता पंचमी यात्रा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने व पासधारक,स्थानिक रहिवाशी खेरीज करून) टेंबलाई मंदीराकडे जाण्यास पूर्ण वेळी बंदी करण्यात येत आहे.
श्री. त्र्यंबोली देवी मंदीराकडे टेलिफोन टॉवरकडून जाणारा मार्ग हा टेलिफोन टॉवर ते त्र्यंबोली देवी मंदीर गेट व पुढे आर्मी ऑफिसर्स कॉटर्सकडे जाणारा रस्ता ते विक्रम नगर पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता कॉर्नर या तिन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
अवजड  मोटार वाहतूकीसाठी प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग -तावडे हॉटेलकडून येवून ताराराणी चौक व टेंबलाबाई रेल्वे फाटक मार्गे कागलकडे जाणारी सर्व जड,अवजड व हलकी मालवाहू वाहने ही ताराराणी चौकातून शिरोली जकात नाका, तावडे हॉटेल येथूनच सरनोबतवाडी मार्गे कागलकडे रवाना. त्यांना टेंबलाई रेल्वे फाटक चौकाकडे येण्यास मनाई करण्यात येत आहे.
टेंबलाई रेल्वे फाटक मार्गे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ये-जा करणाऱ्या एस.टी. व के.एम.टी बसेस यांनी तावडे हॉटेल मार्गे कागलकडे सोईनुसार मार्गस्थ व्हावे.
श्री त्र्यंबोली देवी यात्रा विशेष के.एम.टी. बसेस टाकाळा सिग्नल चौक, टेंबलाई रेल्वे फाटक, टेलिफोन टॉवर येथे येतील व त्याच मार्गे मार्गस्थ होतील.
सकाळी 6 ते 10 वाजेपर्यत टाकाळा सिग्नल चौककडून श्री त्र्यंबोली मंदीराकडे जाणारी सर्व अवजड मोटार वाहने टाकाळा चौकातून वि.स. खांडेकर मार्गावरून राजारामपूरी रोडने सायबर कॉलेज,शिवाजी विद्यापीठ मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
सकाळी 6 वाजल्यापासून उचगाव फाट्याकडून टेंबलाई मंदीराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गणेश मंदीर फाट्याजवळ प्रवेश बंद करण्यात येत असून त्यांनी उचगाव फाट्यावरून सरनोबतवाडी मार्गे किंवा तावडे हॉटेल मार्गे सोईनुसार मार्गस्थ व्हावे.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.