बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

केंद्र शासनाचा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक





   कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) :  पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 चा पुरस्कार जिल्हा परिषदेने ऑनलाईन सादर केलेल्या नामांकनाकेंद्र शासनाकडील पंचायती राज मंत्रालय, यांच्यामार्फत जाहीर झाला होता. दिल्ली येथील सी. सुब्रमन्यम हॉल मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात पंचायती राज केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिल्हा परिषदेच्यावतीने सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र) रविकांत आडसुळ यांनी स्वीकारला. प्रमाणपत्र व  30 लाख रुपये  असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
        जिल्हा परिषदेने विविध योजना व नाविन्यपूर्ण योजना चांगल्याप्रकारे राबविलेल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे प्रशासकीय बाबी, सर्वसाधारण सभा कामकाज, सभा कामकाजाचे रेकॉर्ड, सभेस जि.प. सदस्य यांची उपस्थिती इ. सह जिल्हा परिषदेकडील योजना जिल्हा परिषदेने राबविलेल्या वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती याची पडताळणी करणेत आली होती. जि. प. च्या नाविन्यपूर्ण   वैशिष्टपूर्ण उपक्रमांमध्ये पर्यावरण पुरक गणेशोत्सव, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करणे, स्वच्छ भारत मिशन, डिजीटल शाळा, स्वच्छ विद्यालय पुरस्कार,‍ ‍शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशाला, रेकॉर्ड  वर्गीकरण अंतर्गत्‍  डिजीटल रेकॉर्ड रुम, दिव्यांग उन्नती अभियान, बायोगॅस,  आधारवड, कॅन्सर सर्व्हेक्षण, महिला बचत गटांचे काम, घरकुल योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड, वॉटर एटीएम, आयएसओ पशुसंवर्धन दवाखाने या योजना चांगल्याप्रकारे राबविलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या  प्रस्तावाचे सादरीकरण सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आलेले होते.
 0 00 0 0 0 0
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.