गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन/ दुचाकी वाहनांसाठी 9 ऑक्टोबरपासून नवीन नावाची नोंदणी सुरु/ आरोग्य विभाग 10 ते 25 ऑक्टोबर या दरम्यान रोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविणार


276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी
मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन
कोल्हापूर - 3 (जिमाका) : विधानसभा निवडणूक-2019 च्या 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी महर्षी बापूजी साळुंखे स्मृतीभवन विवेकानंद कॉलेज नागाळा पार्क येथील मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ यांनी दिली.
जनतेच्या सोयीसाठी मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन केले असून, त्या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2668744 असा आहे.  मदत व तक्रारीसाठी जनतेने या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  
0000

दुचाकी वाहनांसाठी 9 ऑक्टोबरपासून नवीन नावाची नोंदणी सुरु
कोल्हापूर - 3 (जिमाका) : खासगी दुचाकी वाहनाची जूनी नोंदणी मालिका एम.एच.09- एफ.जी. ही दि. 8 ऑक्टोबर पर्यंत संपुष्टात येत आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय नव्याने दुचाकी नोंदणी मालिका एम.एच.09- एफ.एच. ही दि. 9 ऑक्टोबरपासून सुरु करीत आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस.टी. अल्वारिस यांनी दिली.
ज्या दुचाकी वाहनधारकांना नवीन नावाची नोंदणी करावयाची आहे, अशा वाहनधारकांनी यांचा लाभा घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय ताराबाई पार्क येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
आरोग्य विभाग 10 ते 25 ऑक्टोबर या दरम्यान
रोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविणार
कोल्हापूर - 3 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त 10 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोध मोहिम व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरुकता अभियान-2019 हे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य सेवा कु्ठारोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश पाटील यांनी दिली.
या अभियानासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी, गावागावात भेटी देवून तपासणी करण्यात येणार आहेत, तरी जनतेने याबाबतची माहिती आरोग्य विभागाला दयावी असे आवाहन करण्यात येत आहे.
00000
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.