शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

हॉटेल शिवारचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित



कोल्हापूर,दि. 19 (जि.मा.का.) :  देशी दारुची विक्री करुन नियम भंग करणाऱ्या शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथील हॉटेल शिवार या बारचा परवाना आजपासून 15 दिवसांसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निलंबित केला.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कालावधीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सर्व अनुज्ञप्तीधारकांना अनुज्ञप्तीच्या अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आचारसंहिता कालावधीमध्ये सुरेश शंकर भेंडवडे, हॉटेल शिवार या अनुज्ञप्तीधारकाने आचारसंहिता कालावधीमध्ये दिलेल्या सूचनांचे व निर्देशाचे पालन न केल्याने  आजपासून 15 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबित केली आहे.
            जिल्ह्यातील अबकारी अनुज्ञप्तीधारकाकडून अनुज्ञप्तीच्या नियम, अटी व शर्तीचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.