शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

मतमोजणी आवारात मनाई आदेश जारी



कोल्हापूर दि. 19 (जि.मा.का.) :- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 साठी 10 मतदार संघाची मतमोजणी गुरूवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी होणार असून या दिवशी मतमोजणी ठिकाणच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी 1973 चे कलम 144 अन्वये दिनांक 24 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.
   271 चंदगड‍ विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीचे ठिकाणी पॅव्हेलियन हॉल, नगरपरिषद, गडहिंग्लज.  272 राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीचे ठिकाणी तालुका क्रिडा संकुल, मौनी विद्यापीठ गारगोटी. 273 कागल विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीचे ठिकाण जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल. 274 कोल्हापूर (दक्षिण) विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीचे ठिकाणी A- हॉल, शासकिय गोदाम, राजाराम तलाव जवळ, सरनोबतवाडी, रोड, कोल्हापूर. 275 करवीर विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीचे ठिकाण A- हॉल, शासकिय धान्य गोदाम, रमणमळा, कसबा बावडा रोड, कोल्हापूर. 276 कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीचे ठिकाण शासकीय गोदाम, राजाराम तलाव जवळ, सरनोबतवाडी रोड, कोल्हापूर. 277 शाहूवाडी विधानसभा मतदान केंद्रासाठी मतमोजणीचे ठिकाण जुने शासकिय धान्य गोडावून शाहूवाडी. 278  हातकणंगले विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीचे ठिकाणी शासकिय धान्य गोदाम, नवीन प्रशासकीय इमारत जवळ, हातकणंगले. 279 इचलकरंजी विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीचे ठिकाण राजीव गांधी भवन, इचलकरंजी. 280 शिरोळ विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीचे ठिकाण पहिला मजला, तहसिलदार कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, शिरोळ.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.