पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक मुक्तीची शपथ
... महापालिका
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
कोल्हापूर
- 01 (जिमाका) : कोल्हापूर
जिल्हा परिषद
मुख्यालयामध्ये स्वच्छता व श्रमदानाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला महापालिका
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे प्रमुख पाहूणे
म्हणून उपस्थित होते. दि. 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा
उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषदमार्फत जनजागृती, स्वच्छता, प्लास्टीक बंदीची शपथ, श्रमदान व संकलित
प्लास्टीकचे सुयोग्य व्यवस्थापन इत्यादी उपक्रम राबविले जात आहे, अशी माहिती जिल्हा
परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे
यांनी दिली.
या उपक्रमातंर्गत आज 1
ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद येथे कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन
करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थितांना
प्लास्टीक मुक्तीची शपथ दिली व 4 R म्हणजे refuse, reduce, reuse, recycle यांचा अवलंब
करण्याचा संदेश दिला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी या उपक्रमात
मोठया संख्येने सहभाग नोंदवून जिल्हा प्लास्टीक मुक्त करूया असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
प्रियदर्शिनी मोरे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.
कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र. ) रविकांत अडसूळ, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं. ) राजेंद्र भालेराव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती
उबाळे इत्यादी विभागप्रमुख उपस्थित होते. उपस्थित कर्मचारी, अधिकारी यांनी श्रमदान
करून कार्यालयातील प्लास्टिक संकलित केले आणि ते अंतिम व्यवस्थापनासाठी पाणी व स्वच्छता
विभागाकडे जमा करण्यात आले. या मोहिमेला जिल्हा परिषदेकडील 120 कर्मचारी सहभागी झाले
असून, 32 किलोग्रॅम प्लास्टिक संकलित करण्यात आले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.