कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी
नेमलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना उद्या मंगळावार 22 ऑक्टोबर रोजी, नियमित कार्यालयात
उपस्थित राहण्यास सूट देण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
दौलत देसाई यांनी आज दिले.
विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची सर-मिसळ प्रक्रिया
केल्याने ते त्यांच्या कार्यालयाच्या मतदारसंघातून इतर मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर
नेमले गेले आहेत. निवडणूक कर्तव्यावर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी हे आज दिनांक
21 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री उशीरापर्यंत निवडणूक प्रक्रियेत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे
संबंधित मतदान केंद्राध्यक्ष/मतदान अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयीन मुख्यालयात
पोहोचण्याकरिता प्रवासासाठी जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यांना दिनांक 22 ऑक्टोबर रोजी नियमित कार्यालयीन कर्तव्यासाठी कार्यालयात
उपस्थित राहण्यास अडथळा निर्माण होत असल्याने त्यांना सूट देण्यात येत आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.