गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

1971 च्या पाकिस्तान युध्दात सहभागी माजी सैनिकांना कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील 1971 च्या पाकिस्तान युध्दात सक्रीय सहभाग घेतलेल्या व माजी सैनिक व्याख्येत येणारे सैनिक ज्यांना सैन्य सेवेचे निवृत्तीवेतन किंवा केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून मासिक/वार्षिक चरितार्थ आर्थिक मदत मिळत नाही अशा माजी सैनिक, विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे 1971 च्या पाकिस्तान युध्दात सक्रीय सहभाग घेतल्याबाबतच्या पुराव्याची छायांकित प्रत, डिसचार्ज पुस्तक, ओळख पत्र व स्वत:चा मोबाईल नंबर घेवून कार्यालयीन वेळेत दि. 15 जानेवारी पर्यंत हजर रहावे, अे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले यांनी केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.