गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

शिवछत्रपती राज्य क्रीडा व अन्य क्रीडा पुरस्कार सूचना/अभिप्राय 22 जानेवारी पर्यंत पाठवावेत -जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे


कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) :  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबतची नियमावली शासन निर्णयानुसार निर्गमित केलेली आहे. पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबात खेळाडू, नागरिक, संघटना यांनी सूचना/ अभिप्राय dsysdesk14@gmail.com किंवा desk14.dsys-mh@gov.in या मेलवर 22 जानेवारी पर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतिवर्षीप्रमाणे शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक /जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू/ साहसी/दिव्यांग/खेळाडू पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर, विभागीय उपसंचालक कोल्हापूर अथवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य म्हाळूंगे बालेवाडी, पुणे यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. साखरे यांनी कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.