कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा परिषदेच्या
समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष
मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग व दिव्यांगांसाठीच्या सर्व मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे
प्रस्ताव विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांची प्रत्यक्षात
उपस्थिती शिथिल करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या सन 2020-21
या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती व फ्रीशिपचे अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यासाठी शिबीराचे
आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी
दिली आहे.
गडहिंग्लज- 18 जानेवारी प्राथमिक व 19 जानेवारी माध्यमिक गडहिंग्लज
हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गडहिंग्लज. चंदगड- 20 जानेवारी प्राथमिक व 21
जानेवारी माध्यमिक न्यू इंग्लिश स्कुल, चंदगड. राधानगरी- 22 जानेवारी प्राथमिक व 25
जानेवारी माध्यमिक शिवाजीराव खोराटे हायस्कूल, सरवडे. आजरा- 27 जानेवारी प्राथमिक
व 28 जानेवारी माध्यमिक आजरा हायस्कुल, आजरा. गगनबावडा- 29 जानेवारी रोजी प्राथमिक
व माध्यमिक दत्ताजीराव मोहिते पाटील, माध्यमिक विद्यालय, तिसंगी. भुदरगड- 1
फेब्रुवारी प्राथमिक व 2 फेब्रुवारी माध्यमिक
श्री. मौनी महाराज (बनारस) हायस्कूल, गारगोटी. कागल-3 फेब्रुवारी प्राथमिक व 4 फेब्रुवारी माध्यमिक श्री. शाहू
हायस्कूल, कागल. पन्हाळा- 5 फेब्रुवारी प्राथमिक व 8 फेब्रुवारी माध्यमिक आनंदीबाई
ब.सरनोबत गर्ल्स हायस्कूल, आसुर्ले-पोर्ले. शाहूवाडी- 9 फेब्रुवारी प्राथमिक व 10 फेब्रुवारी माध्यमिक महात्मा गांधी
विद्यालय, बांबवडे. हातकणंगले वडगाव- 11 फेब्रुवारी रोजी प्राथमिक व माध्यमिक बळवंतराव हायस्कूल,
पेठवडगाव. इलचकरंजी- 12 फेब्रुवारी रोजी प्राथमिक व माध्यमिक गोविंदराव हायस्कूल
इचलकरंजी. शिरोळ- 15 फेब्रुवारी प्राथमिक व 16 फेब्रुवारी माध्यमिक नवजीवन
हायस्कूल, जयसिंगपूर. करवीर- 17
फेब्रुवारी रोजी प्राथमिक व माध्यमिक वि.म. लोहिया मूकबधिर विद्यालय, कोल्हापूर
येथे शिष्यवृत्तीसाठीचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व मॅट्रीकपूर्व
शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव
विहीत दिनांक व ठिकाणी सादर करावेत. विद्यार्थी देय शिष्यवृत्तीपासून वंचित राहू
नये यासाठी पालक, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी आवश्यक सहकार्य करण्याचे
आवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.