गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर नोंदणी केल्याशिवाय सुरू न करण्याचे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांचे आवाहन

 

 


 

कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर प्राणी कल्याण मंडळाची नोंदणी केल्याशिवाय सुरू न करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले आहे.

 प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम 2018 आणि श्वान प्रजनन व विपणन नियम 2017 या नियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाळीव प्राण्यांची दुकाने तसेच श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, पुणे यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.

ग्रामपंचायत/ नगरपालिका/ महानगरपालिका येथील कर्मचाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करून कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर यांना 30 दिवसाच्या आत नोंदणी करून घेण्यासाठी नोटीस देण्याबाबत आदेशित करावे व जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयास अवगत करावे, असेही श्री. पठाण यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.