कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): मुक्त
विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या
विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज स्वीकारण्याच्या
कालावधीस मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्र.विभागीय
सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
गुरूवार
31 जानेवारी रोजी रात्री 11.59 वा. पर्यंत विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन
भरणे. मंगळवार दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क
व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे.
शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी संपर्क
केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय
मंडळाकडे जमा करणे.
नमूद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ.
5 वी व इ. 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ae.in या
संकेतस्थळावरील सूचना वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.