कोल्हापूर,
दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी
सहयोग व विशेष उपक्रम केंद्रांतर्गत रामेती, कोल्हापूर या संस्थेस अभ्यासकेंद्र
चालविण्यास मान्यता दिली आहे. सहा महिने (आठवड्यातून एकदा) कालावधीचा शेतकरी
उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता दिली
आहे. हा अभ्यासक्रम रामेती येथे दि. 1 फेब्रुवारी 2021 ते जून 2021 या कालावधीत सुरू होत असून इच्छुक
उमेदवारांनी दि. 31 जानेवारी पूर्वी http://ycmou.digitaluniversity.ac
व www.ycmou.ac.in
या लिंकव्दारे नाव नोंदणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन प्रादेशिक कृषी
विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.