कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आज विविध
अधिकारी-कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम राबवून अवघ्या अर्ध्या तासात परिसर स्वच्छ
केला. वरिष्ठ भू वैज्ञानिक ऋषीराज गोसकी यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला.
प्रशासकीय
इमारतीमध्ये विविध विभागांचे जवळपास 20 कार्यालये आहेत. या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या
अभ्यागतांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे परिसरात विविध प्रकारचा कचरा
सर्वत्र पसरलेला असतो. श्री. गोसकी यांनी हा कचरा स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून
इमारतीमधील सर्व कार्यालयीन प्रमुखांशी संपर्क साधून स्वच्छता मोहीम राबविण्याचा
विचार मांडला.
काल
मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ देण्याच्या कार्यक्रमाबरोबरच दर शुक्रवारी
सायं. 5.30 नंतर प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छतेसाठी केवळ 5 मिनीटे
देण्याचे ठरले. त्याची सुरूवात आजपासून करण्यात आली. अवघ्या 5 मिनीटे म्हणता
अर्ध्या तासात कचऱ्याचे ढिगारे परिसरात गोळा झाले. आजच्या या मोहिमेत स्वच्छतादूत आमित
कुलकर्णी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा माहिती कार्यालय, मुद्रांक
कार्यालय, राधानगरी प्रांत कार्यालय, ग्राहक न्यायालय, विभागीय माहिती कार्यालय, तहसिलदार
कार्यालय संजय गांधी कार्यालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, आदी
कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.