शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण विषयावर मंगळवारी कार्यशाळा प्लॅटधारक, पदाधिकारी, सभासदांनी उपस्थित रहावे - उप निबंधक प्रकाश जगताप

 


कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण या विषयावर दि. 12 जानेवारी रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील प्लॅट धारक, सहकार गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोल्हापूर शहराचे उप निबंधक प्रकाश जगताप यांनी केले अहे.

सहकार विभागामार्फत दि. 1 ते 15 जानेवारी  या कालावधीत सहकारी गृहनिर्माण संस्थोचा मानीव अभिहस्तातरंणाबाबत जन जागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कार्यशाळेमध्ये सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधकश्रीकृष्ण वाडेकर,  विभागीय उप निबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, अमर शिंदे, व श्री. उप निबंधक प्रकाश जगताप हे मार्गदर्शनक करणार आहेत.

संस्था पदाधिकारी व सभासदांनी अधिक माहितीसाठी उप निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर व कोल्हापूर जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यशाळा वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर मुख्य कार्यालय, ताराराणी चौक, काळवा नाका येथे आहे.

0 0 0 0 00

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.