कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती
कार्यालय) : मराठी भाषेचा
प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या हेतूने सन 2013 पासून दरवर्षी मराठी भाषा
संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. यावर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरावडा दि. 14
ते 28 जानेवारी या कालवधीत साजरा करण्यात येणार असल्याचे ग्रंथालय संचालक शालिनी
इंगोले यांनी कळविले आहे.
मराठी भाषेचा प्रचार,
प्रसार व संवर्धन व्हावे यासाठी सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/ महामंडळे,
केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये/ ग्रंथालये
इत्यादी सर्व संस्थांमधून राज्याची राज्यभाषा असलेल्या मराठी भाषेचा उपयोग
जास्तीत-जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने मराठी भाषा
संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.