बुधवार, १३ जानेवारी, २०२१

शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रवेशासाठी मुदतवाढ

 


कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रवेश प्रकियेच्या अंतिम फेरीच्या समारोपांनतर काही शाखांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने शुक्रवार दि. 15 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्य पी.यू. वायसे यांनी दिली.

शासकीय तंत्रनिकेतनमधील इंडस्ट्रियल इलेक्ट्र्रॉनिक्स, मेकॅनिकल, मेटलर्जी या शाखांमध्ये जागा शिल्लक आहेत. प्रवेशासाठी कॅप फॉर्म भरलेले, फॉर्म न भरलेले किंवा इतरत्र प्रवेश घेतलेले आणि दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी पात्र आहेत. प्रवेशासाठी 8 हजार 490 रूपये वार्षिक शुल्क आहे. काही विद्यार्थ्यांचे इतर संस्थेत प्रवेश घेतल्यामुळे त्यांच्याकडे मूळ कागदपत्रे उपलब्ध नसतील अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असल्यास आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीवर प्रवेश निश्चित केला जाईल. त्यामुळे सर्व 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्राचार्य श्री. वायसे यांनी केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.