कोल्हापूर,
दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील ग्रामपंचायत या निवडणूक होऊ घातलेल्या
गावातील सर्व दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार,
औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना कामगारांना भरपगारी मतदानांच्या दिवशी
शुक्रवार दि. 15 जानेवारी रोजी सुटी जाहीर केली आहे.
निवडणूक
होणाऱ्या ज्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (MIDC) तसेच
महानगरपालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत. अशा ठिकाणी नोकरी
निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींमधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता
यावा यादृष्टीने अशा मतदारांना शुक्रवार दि. 15 जानेवारी या मतदानाच्या दिवशी
भरपगारी सुट्टी/विशेष सवलत देण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त
अविनाश सणस यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.