कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1027 प्राप्त अहवालापैकी 1018 निगेटिव्ह तर
पॉझीटिव्ह 6 (2 अहवाल नाकारले तर 1 नमुना अहवाल पुन्हा सादर ), ॲन्टीजेन चाचणीचे 118 प्राप्त अहवालापैकी 118 निगेटिव्ह. असे एकूण 6 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 569 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 810 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 50 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 6 पॉझीटिव्ह अहवालापैकी करवीर-4 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 2 असा समावेश
आहे.
आज अखेर तालुका, नपा आणि
मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 873, भुदरगड- 1231,
चंदगड- 1217, गडहिंग्लज- 1490, गगनबावडा- 148, हातकणंगले-5311, कागल-1668, करवीर-
5679, पन्हाळा- 1866, राधानगरी-1245, शाहूवाडी-1356, शिरोळ- 2509, नगरपरिषद
क्षेत्र-7470, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 120 असे एकूण 47 हजार 183 आणि
इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 386 असे मिळून एकूण 49 हजार 569 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील 49 हजार 569 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 810 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 709 जणांचा मृत्यू
झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 50 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.