कोल्हापूर,
दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोविड-19 लसीकरण
कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये आज कोवीड लसीकरणाची रंगीत तालीम / Dry Run घेण्यात
आली. कोवीड 19 नियंत्रणासाठी केंद्र शासनाकडून लसीकरण लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
लसीकरणाची पूर्व तयारी, लसीकरण सुरुळीत होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला आत्मविश्वास यासाठी राज्यामध्ये
रंगीत तालीम / Dry Run घेण्यात आली.
आज, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची
शिरोली, सेवा रुग्णालय कसबा बावडा, पंचगंगा रुग्णालय कोल्हापूर, सी.पी.आर
कोल्हापूर येथे कोवीड लसीकरणाची रंगीत तालीम / Dry Run घेण्यात आली. कोविड लसीकरण
केंद्र, प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष व्यवस्था होती. गुंतागुंत
निर्माण झाल्यास AEFI किट , ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली. यावेळी, 5
अधिकाऱ्यांची टीम कार्यरत ठेवण्यात होती. लसीकरण लाभार्थी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन,
पडताळणी व्यवस्था व 102, 108 रुग्णवाहिकासह इतर सर्व सोईसुविधा यावेळी उपलब्ध
होत्या.
या लसीकरण
मोहिमेसाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा
परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सतिश
पाटील, आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती हंबीरराव पाटील तसेच आरोग्य समितीचे सदस्य यांचे यावेळी मागदर्शन लाभले.
या
लसीकरण मोहिमेच्या पूर्व तयारी आयोजन करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश
साळे, ज़िल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अधिष्ठता डॉ. मोरे, जिल्हा माता बाल
संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य
केंद्राकडील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सोबत : फोटो जोडला आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.