मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

पाच ल.पा. तलावावर उपसा बंदी

 


कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : पंचगंगा पाटबंधारे उपविभागांतर्गत करवीर तालुक्यातील कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगाव व  दऱ्याचे वडगाव ल.पा. तलाव येथील जलाशयातील पाण्यावर व त्या खालील बंधाऱ्यावर शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी करण्यात आली असल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता संदिप दावणे यांनी दिली.

उपसा बंदी उपसा कालावधीतील कार्यवाहीचा भाग कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगाव, दऱ्याचे वडगाव ल.पा. तलाव जलाशय व धरण पायथ्यापासून बोलोली को.प. बंधाऱ्यापर्यंत हरवळ नाल्यावर तसेच उपवडे जलाशयातून शेतीसाठी उपसा करणाऱ्या यंत्रावर उपसा बंदी कालावधी याप्रमाणे

       उपवडे ल.पा. तलाव जलाशयात 21 जानेवारी पर्यंत 11 दिवस, दि. 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 11 दिवस, दि. 8 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 11 दिवस, दि. 22 फेब्रुवारी ते 4 मार्च 11 दिवस, दि. 22 मार्च ते पुढील आदेशापर्यंत उपसा बंदी करण्यात येणार आहे.

          उपवडे धरणपायथ्यापासून ते बोलोली को.प. बंधाऱ्यापर्यंत दि. 14 जानेवारी पर्यंत, दि. 18 ते 21 जानेवारी 4 दिवस, दि. 25 ते 28 जानेवारी 4 दिवस, दि. 1 ते 4 फेब्रुवारी 4 दिवस, 8 ते 11 फेब्रुवारी 4 दिवस, दि. 15 ते 18 फेब्रुवारी  4 दिवस, दि. 22 ते 25 फेब्रुवारी 4 दिवस, 28 फेब्रुवारी ते 3 मार्च 4 दिवस, दि. 7 ते 10 मार्च 4 दिवस,  दि. 14 ते 17 मार्च 4 दिवस, दि. 21 ते 24 मार्च 4 दिवस व दि. 28 मार्च ते पुढील आदेशापर्यंत उपसा बंदी करण्यात येणार आहे.

          कणेरीवाडी ल.पा. तलावावर दि. 17 ते 31 जानेवारी 15 दिवस, दि. 7 ते 21 फेब्रुवारी 15 दिवस, दि. 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 15 दिवस, दि. 21 मार्च ते 4 एप्रिल 15 दिवस, दि. 11 ते 25 एप्रिल 15 दिवस, दि. 2 ते 16 मे 15 दिवस व दि. 23 मे ते पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी करण्यात येणार आहे.

          कंदलगाव ल.पा. तलावावर दि. 17 ते 31 जानेवारी 15 दिवस, दि. 7 ते 21 फेब्रुवारी 15 दिवस, दि. 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 15 दिवस, दि. 21 मार्च ते 4 एप्रिल 15 दिवस, दि.  11 ते 25 एप्रिल 15 दिवस, दि. 2 मे ते 16 मे 15 दिवस व दि. 23 मे ते पुढील आदेशापर्यंत उपसा बंदी करण्यात येणार आहे.  

          राजाराम ल.पा. तलावावर दि. 17 ते 31 जानेवारी  15 दिवस, दि. 7 ते 21 फेब्रुवारी 15 दिवस, दि. 28 फेब्रवारी ते 14 मार्च 15 दिवस, दि. 21 मार्च ते 4 एप्रिल 15 दिवस, दि. 11 ते 25 एप्रिल 15 दिवस, दि. 2 मे ते 16 मे 15 दिवस व 23 मे ते पुढील आदेशापर्यंत उपसा बंदी करण्यात येणार आहे.

          दऱ्याचे वडगाव ल.पा. तलावावर दि. 17 ते 31 जानेवारी 15 दिवस, दि. 7 ते 21 फेब्रुवारी 15 दिवस, 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 15 दिवस, 21 मार्च ते 4 एप्रिल 15 दिवस, दि. 11 ते 25 एप्रिल 15 दिवस, दि. 2 मे ते 16 मे 15 दिवस व दि. 23 मे ते पुढील आदेशापर्यंत उपसा बंदी करण्यात येणार आहे.

           जिल्ह्यातील वर नमुद केलेल्या उपसाबंदी अंमलात आणावयाच्या कार्यक्षेत्रातील विद्युत मंडळातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांनी वर नमुद केलेल्या उपवडे ल.पा. तलाव येथील जलाशयातील सर्व तीरावर वर नमुद केलेल्या कालावधीसाठी शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत उपसायंत्राची तारामंडळे काढून घ्यावीत. तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उपसा तेल यंत्रांना सील करावे व आदेशातील उपसा बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.