शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

निवड सूचीसाठी लोककला व पथनाट्य संस्थांनी 21 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत जिल्हा माहिती अधिकारी यांचे आवाहन

 

 


 

कोल्हापूर दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय ): लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची निवड सूची 20 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. याबाबत नवीन निवड सूची तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांनी निवड सूचीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर येथे 21 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे.

निवड सूचीसाठी dgipr.maharashtra.gov.in  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाबरोबरच जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर येथे अर्ज उपलब्ध आहेत. तरी इच्छुक संस्थांनी निवड सूचीसाठीचे अर्ज 21 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावेत, असे आवाहनही जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी केले आहे.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.