कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा
माहिती कार्यालय) : वाहनांना नियमबाह्य फिल्मींग करणारे, सीट बेल्ट न लावणारे वाहन
व वाहन चालकांवर तसेच मोटर सायकलवरून ट्रीपल सीट फिरणारे, विहीत नमुन्यात नंबर
प्लेट नसणारे, कर्कश हॉर्न लावणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष
व्यापक मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या
मोहिमेत वाहनांना नियमबाह्य फिल्मींग असणाऱ्या एकुण 34 वाहनांवर, सीट बेल्ट न
लावणाऱ्या एकुण 11 वाहनांवर, मोटार सायकलवरून ट्रीपल सीट फिरणाऱ्या एकुण 25
वाहनांवर, वाहनांना विहित नमुन्यात नंबर प्लेट नसणाऱ्या एकुण 41 वाहनांवर व
वाहनांना कर्कश हॉर्न असणाऱ्या एकुण 24 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर
वाहतुक नियंत्रण शाखेकडून प्रसिध्दी पत्रकाव्दारे देण्यात आली.
जिल्ह्यातील
सर्व नागरिक/ वाहनचालकांनी विहीत नमुन्यातील मापदंडाप्रमाणे वाहनांचे नंबरप्लेट बसवून,
वाहन चालवताना सीटबेल्ट लावण्याची दक्षता घेवून, वाहनांना कर्कश हॉर्न न लावता
तसेच ट्रीपल सीट न फिरता, सोबत आपले मूळ ड्रायव्हिंग लायसन्स व आपल्या वाहनांच्या
कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जवळ बाळगाव्यात तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचेही काटेकोरपणे
पालन करण्याचे आवाहनही शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत करण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.