कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती
कार्यालय) : मलकापूर व गगनबावडा तालुक्यांमधील शिबीर कार्यालयासाठी (कॅम्प) प्रादेशिक
परिवहन कार्यालयातर्फे तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे
या कॅम्पच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी
डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
मलकापूर तालुका- 18 व 28
जानेवारी व गगनबावडा तालुका- 22
जानेवारी याप्रमाणे बदलून दिलेल्या तारखेस कार्यालयातर्फे शिबीर कार्यालय घेण्यात
येईल याची मलकापूर व गगनबावडा तालुक्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.