कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती
कार्यालय) : जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर तसेच इलेक्ट्रीकल ऑडीट
करा, असे निर्देश देतानाच त्यासाठीचा खर्च आपत्ती व्यवस्थापनमधून दिला जाईल, असे
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
येथील सीपीआर व भंडारा
येथील शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी उद्भवलेल्या आगीच्या घटनेच्या अनुषंगाने जिल्हा
रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज आणि आयजीएम रुग्णालय इचलकरंजी या तीनही
ठिकाणच्या अग्नी सुरक्षा तसेच विद्युत सुरक्षेच्या अनुषंगाने समित्या स्थापन
करण्यात आल्या होत्या. त्याबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील
छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात झाली.
यावेळी सविस्तर आढावा
घेवून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व
ग्रामीण रुग्णालयात आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार करुन घ्यावेत. त्याचबरोबर
अधिकारी व कर्मचारी यांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करावे आणि रंगीत तालीम
घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शासकीय
रुग्णालयांचे अग्नी व विद्युत ऑडीट मान्यताप्राप्त एजन्सीकडून करुन घ्यावे.
त्यासाठी लागणारा खर्च आपत्ती व्यवस्थापनामधून दिला जाईल. शासकीय रुग्णालयात
बसविण्यात येणाऱ्या यंत्र सामुग्रीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक
तयार करुन द्यावे. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची मागणी राज्य शासनाकडे करु, असे
आश्वासनही त्यांनी दिले.
या बैठकीला जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुश
कावळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, डॉ.व्ही.बी, बर्गे आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.