कोल्हापूर,
दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास (PMKVY3.0) योजनेची
अंमलबजावणी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेस संपर्क साधून तेथे उपलब्ध असणारा अर्ज आवश्यक माहिती भरून प्रशिक्षण
कोर्ससाठी इच्छुकता नोंदवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
ॲटोमोटीव्ह सर्व्हिसेस टेक्निशियन लेवल 4, सेल्फ एम्लॉयड टेलर,
डाटा एन्ट्री ऑपरेटर, फिल्ड टेक्निशिएन कॉम्प्युटिंग ॲड पेरीफेरल्सस, ज्युनि. सॉफ्टवेअर
डेव्हलपर, ब्युटी थेरपिस्ट, रीटेल ट्रेनी असोशिएट हे कोर्सेस मोफत घेण्यात येणार
आहेत. या कोर्सेसचे प्रशिक्षण मान्यताप्राप्त व नोंदणीकृत शासकीय/खासगी प्रशिक्षण
संस्थांमार्फत देण्यात येणार आहे, असेही श्री. माळी यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.