मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

चंदगड निवडणूक निरीक्षक पदी भगवान कांबळे

 


कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : विभागीय आयुक्त पुणे यांनी चंदगड तालुक्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून निवड केली आहे.

दि. 9 जानेवारी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी, प्रचार कालावधीत अचानक एका दिवशी,  दि. 15 जानेवारी मतदानाच्या दिवशी व दि. 18 जानेवारी मतमोजणीच्या दिवशी निवडणूक निरीक्षक हे चंदगड तहसिलदार कार्यालयास भेट देतील.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.