कोल्हापूर,
दि. २५, (जिल्हा माहिती कार्यालय): लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावून नवभारत
घडविण्यासाठी मतदारांनी मतदानास पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात 11 व्या राष्ट्रीय
मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास महापालिका
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी
वैभव नावाडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, तहसिलदार शीतल मुळे-भांमरे,
शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व
नवमतदार उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
उपस्थितांना 11 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ दिली.
जिल्हाधिकारी
श्री. देसाई म्हणाले, चांगले लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी मतदारांचे योगदान
मोलाचे असते. लोकशाही बळकट करण्यासाठी 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी आपल्या नावाची
मतदार म्हणून नोंदणी करावी. केवळ नोंदणी करून न थांबता येणाऱ्या प्रत्येक
निवडणुकीमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार
पडावी यासाठी प्रशासन काम करत असते. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी
प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार या
उपक्रमामध्ये सहभागी होत असतात. तसेच कोल्हापूर जिल्हा मतदानामध्ये नेहमीच उल्लेखनीय काम करत आहे. याबद्दल त्यांनी
समाधान व्यक्त केले.
डॉ.
बलकवडे म्हणाल्या, लोकशाहीने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रत्येकाने मतदान
करणे आवश्यक आहे. मतदान करण्यासाठी मतदारांनी वेळ काढला पाहीजे. देशाच्या
भवितव्यासाठी मतदान करण्यास नवमतदारांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी नवमतदारांना
केले.
श्री.
कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. निवडणूक आयोगाच्या स्थापनेचा दिवस मतदार
दिवस म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले. यंदाचा 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस
असून सक्षम, जागरूक, सुरक्षित आणि माहितगार मतदार ही यावर्षीची थीम असल्याचे
त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात
दिव्यांग मतदार,नव मतदारांना मतदार
ओळखपत्रमतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ब्रेन लिपी स्पर्धेतील, निबंध
स्पर्धेतील, वत्कृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र
देण्यात आले. तर निवडणूक साक्षरतेमध्ये आणि केंद्रस्तरीय अधिकारी उल्लेखनीय काम केलेल्या
कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
उपविभागीय
अधिकारी श्री. नावाडकर यांनी आभार मानले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.