कोल्हापूर, दि. 8
(जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत
असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी पध्दतीने
सैनिक संवर्गातून सहाय्यक व्यवस्थापक, सफाई कामगार व सुरक्षा रक्षक ही पदे भरावयाची
असून यासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
प्रदीप ढोले यांनी
सैनिक संवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी
उमेदवारांचा विचार केला जाईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सैनिक संवर्गातील असल्याचा
पुरावा, आधार कार्ड, अनुभवाचा दाखला व अन्य आवश्यक कागदपत्रांसह 15 जानेवारी पर्यंत
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत. निवडीचे व एखादा अर्ज कोणतेही
कारण न देता निकाली काढण्याचा अधिकार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांनी
राखून ठेवला असून अधिक माहितीसाठी 0231-2665812 वर संपर्क साधावा, असेही श्री.
प्रदीप ढोले यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.