सोमवार, २५ जानेवारी, २०२१

राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त राधानगरी अभयारण्य लोगो प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

 







 

      कोल्हापूर, दि. 25 (जि.मा.का.) : राधानगरी अभयारण्याकरीता लोगो निर्धारित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागामार्फत लोगो स्पर्धा ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात आली होती. या प्राप्त प्रदर्शनाचे आजच्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त येथील शाहू स्मारक येथे भरवण्यात आलेल्या लोगो प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

        यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी, सुनील करकरे उपस्थित होते. सुरूवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी प्रदर्शनाची पाहणी केली.

        शुक्रवार दि. 29 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू  असणार आहे. या स्पर्धेला 100 पेक्षा जास्त निसर्गप्रेमींनी लोगो पाठविले. लोगोंमध्ये डिझायनिंगची कला उत्तमपणे वापरत जंगल वन्यजीव-गवा, शेकरु, फुलपाखरु तसेच राजर्षी शाहू महाराजांवर अनेक अप्रतिम लोगो पाठविले आहेत.  राधानगरी अभयारण्य पर्यटनाचे आवडते स्थान असून सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा मोठा ओढा असतो. राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण, बोरबेट पदभ्रमंती, दाजीपूर ट्रेक, दाजीपूर सफारी, देवराया ही सर्व स्थाने निसर्ग वेड्या लोकांना आकर्षित करत असतात. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. माळी यांनी केले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.