कोल्हापूर, दि. 7
(जिल्हा माहिती कार्यालय) : सद्या
जिल्ह्यात 7 वी आर्थिक गणना 2019 चे काम चालू असून महापालिका, पालिका
क्षेत्रांमध्ये नागरिक माहिती देण्यास नकार देत असल्याने समस्या निर्माण होत आहेत.
अशा ठिकाणी महापालिका, नगरपालिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी आज केले.
जिल्हा सांख्यिकी
कार्यालयाच्यावतीने 7 वी आर्थिक गणना 2019 संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील
राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात आढावा
बैठक झाली. या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी विजय पोवार, पोलीस उपअधीक्षक (गृह)
सुनिता नाशिककर उपस्थित होत्या.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी
सायली देवस्थळी यांनी सुरूवातीला स्वागत, प्रास्ताविक करून सद्यस्थितीबाबत माहिती
दिली. 25 नोव्हेंबर 2020 पर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार 6 वी आर्थिक गणना
व 7 व्या आर्थिक गणनेमध्ये संकलित केलेल्या माहितीची तुलना केली असता एकुण
1222 गावांपैकी 364 गावांची उद्योग नोंदणी 6 व्या आर्थिक गणनेपेक्षा जास्त झाली
असून 827 गावांमध्ये उद्योगांची नोंदणी कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रात नागरिक
माहिती देण्यास नकार देत असल्याने काही ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत.
संबंधित सर्व विभागांनी 7
वी आर्थिक गणना 2019 च्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे. विशेषत: महापालिका, नगरपालिकांमधील संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी सूचना
श्री. गलंडे यांनी यावेळी दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.