मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ

 


कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : केंद्र शासन पुरस्कृत महाविद्यालय व विद्यापीठीय सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दि. 20 जानेवारी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून अर्जांवर विना विलंब योग्य ती कार्यवाही करून पात्र अर्ज तात्काळ पुढील टप्प्यावर पाठविण्याचे आवाहन कोल्हापूर विभागाच्या विभागीय सहसंचालकांनी केले आहे.

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन मंजुरी व नुतनीकरणासाठी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याबाबत तात्काळ एसएमएसव्दारे सूचना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.